Devendra Fadnavis : महायुतीला विधानसभा निवडणुकांच्या निकालात स्पष्ट बहुमत मिळालं. महायुतीकडून मुख्यमंत्री कोण? यावर गेले अनेक दिवस खलबतं सुरू होती. महाराष्ट्राचा नवा मुख्यमंत्री कोण होणार? याचं उत्तर अवघ्या महाराष्ट्राला मिळालं आहे. भाजपा नेते देवेंद्र फडणवीसच आता राज्याच्या मुख्यमंत्रिपदी विराजमान होणार आहेत, हे स्पष्ट झालं आहे. आज झालेल्या भाजपा कोअर कमिटी बैठक आणि भाजप विधीमंडळ पक्ष बैठकीत भाजपच्या विधीमंडळ पक्षनेतेपदी निवड करण्यात आली. त्यामुळे फडणवीस हेच मुख्यमंत्री होणार असल्याचं स्पष्ट झालं आहे. देवेंद्र फडणवीस ( Devendra Fadnavis) यांनी जे भाषण केलं त्यात २०१९ बाबत महत्त्वाचा उल्लेख केला.