Maharashtra Government Formation: विधानसभा निवडणुकीच्या निकालाला १० दिवस पूर्ण झाल्यानंतर सत्तास्थापनेचा दावा करण्यात येत आहे. भाजपच्या आमदारांची आता मुंबईत विधानभवनात केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण आणि गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी यांच्या उपस्थितीत बैठक होत आहे. भाजपा आणि शिवसेना (शिंदे) पक्षाच्या अनेक बैठका झाल्यानंतर आता एकनाथ शिंदे हे सरकारमध्ये सामील होणार असल्याची माहिती मिळत आहे. गुरूवारी होणाऱ्या (५ डिसेंबर) शपथविधीवेळी एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार असल्याचे कळत आहे. टाइम्स ऑफ इंडियाने याबद्दलचे वृत्त दिले आहे. बुधवारी वर्षा निवासस्थानी एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यात बैठक झाली. त्यानंतर हे वृत्त समोर आले आहे.