भाजपाच्या विधिमंडळ गटनेतेपदी देवेंद्र फडणवीसांची निवड करण्यात आली आहे. भाजपाच्या विधिमंडळ गटनेतेपदी देवेंद्र फडणवीसांची निवड होताच भाजपाच्या नेत्यांनी आनंद व्यक्त केला. सुधीर मुनगंटीवार यांनी देखील पत्रकारांसोबत संवाद साधत असताना आनंद व्यक्त केला. तसेच त्यांनी यावेळी उद्धव ठाकरेंना टोला लगावला. “उद्धव ठाकरेंनी 2019 मध्ये विश्वासघात केला नसता तर आज त्यांचा सन्मान काळ असता”, असं वक्तव्य सुधीर मुनगंटीवार यांनी केलं आहे.