भाजपाचे देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होणार असल्याचे आता निश्चित झाले आहे. आज भाजपाच्या नवनिर्वाचित आमदारांनी देवेंद्र फडणवीस यांची विधीमंडळ पक्षनेता म्हणून निवड केली आहे. यानंतर देवेंद्र फडणवीस यांचे केंद्रीय मंत्री रामदास आठवले (Ramdas Athawale) यांनी अभिनंदन केले. याचबरोबर महायुतीचा घटक असल्यामुळे रामदास आठवले यांनी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियालाही (आठवले) मंत्रिमंडळात स्थान द्यावे अशी मागणी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्याकडे केली आहे.