मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी पत्रकारांशी संवाद साधताना त्यांच्या उपोषणाबाबत माहिती दिली आहे. “सरकार स्थापन झाल्यावर सामूहिक आमरण उपोषणाची तारीख जाहीर करू”, असं मनोज जरांगे पाटील म्हणाले. तसेच हे उपोषण आझाद मैदानावर किंवा अंतरवाली सराटी येथे होऊ शकते, असंही मनोज जरांगे म्हणाले.