देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार असल्याचं निश्चित झाल्यानंतरही एकनाथ शिंदेंची सरकारमध्ये काय भूमिका असणार याबाबत सस्पेन्स कायम आहे. राजभवनात जाऊन सत्तास्थापनेचा दावा केल्यानंतर देवेंद्र फडणवीसांनी एकनाथ शिंदेंची वर्षा बंगल्यावर त्यांची भेट घेतली. या भेटीत मंत्रिमंडळावर चर्चा झाल्याची माहिती आहे. परंतु, त्यानंतर काहीच अधिकृत माहिती समोर आलेली नाही.