एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री होणार का? असा प्रश्न शिवसेना पक्षाचे नेते दीपक केसरकर यांना विचारण्यात आला. या प्रश्नाचं उत्तर देताना दीपक केसरकर म्हणाले की, “शिवसेनेच्या सर्व आमदारांनी काल संध्याकाळी एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. त्यावेळी आम्ही त्यांना उपमुख्यमंत्रीपद स्वीकारण्याची विनंती केली आहे.”