Uday Samant on invitation card: विधानसभेचा निकाल लागल्यानंतर तब्बल ११ दिवसांनी महायुती सरकारचा शपथविधी होत आहे. मुख्यमंत्री आणि दोन उपमुख्यमंत्र्यांचा आज शपथविधी होईल, असे जाहीर करण्यात आले आहे. आझाद मैदान येथे आज होणाऱ्या शपथविधी सोहळ्यासाठी तीनही पक्षांनी वेगवेगळ्या निमंत्रण पत्रिका छापल्या असून त्यावर उपमुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे यांचे नाव छापलेले नाही. त्यावरून आता विविध चर्चांना तोंड फुटले आहे. एकनाथ शिंदे हे शपथ घेणार की नाही? यावर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले. या विषयावर आता उदय सामंत यांनी आपली भूमिका जाहीर केली असून एकनाथ शिंदे हेच उपमुख्यमंत्री व्हावेत, अशी आमची इच्छा असल्याचे ते म्हणाले. तसेच या विषयाकडे राजकारण म्हणून न पाहता हा विषय आमच्यासाठी भावनिक असल्याचेही ते म्हणाले.