Raj Thackeray Congratulate To New Government : राज्यात नवं सरकार स्थापन झालं असून देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रीपदाची तर एकनाथ शिंदे आणि अजित पवारांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. गेल्या अनेक दिवसांपासून सुरू असलेला सत्तास्थापनेचा तिढा अखेर सुटला आहे. आजपासून राज्यात देवेंद्रपर्वाला सुरुवात झाली आहे. दरम्यान, राज्यात नवं सरकार येताच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पोस्ट केली आहे.