Fadnavis 3.0 Ministers:महाराष्ट्र विधानसभेचं विशेष अधिवेशन झाल्यावर 11 ते 12 तारखेला मंत्रिमंडळ विस्तार होईल, लवकर घोषणा होईल. थोडी कसरत करावी लागेल, अनेक सिनियर आहे, निर्णय घेण्यासाठी नेत्यांना कसब दाखवावे लागेल. अशी माहिती शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट यांनी दिली आहे. मंत्रिमंडळाच्या विस्ताराविषयी गैरसमज करू नका, कुणाला भेटण्यासाठी गेल्यास कुणाची वर्णी लागते असे नाही. फडणवीस, शिंदे, अजित पवार यांचा अधिकार आहे कुणाला मंत्रिपद देणार, गृहमंत्री पदाच ठरलं नाही, वरिष्ठ नेते निर्णय घेतील असेही शिरसाट म्हणाले.