भाजपाचे ज्येष्ठ नेते मधुकर पिचड याचं आज नाशिकमध्ये निधन झालं. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी पिचड यांना श्रद्धांजली वाहिली.
महाराष्ट्रातील आदिवासी समाजासाठी मधुकर पिचड यांनी आयुष्यभर काम केल. पिचड आजारावरती मात करतील असा आम्हाला विश्वास होता. एका चांगल्या सहकाऱ्याला आज आम्ही मुकल्याचं आम्हाला दुःख आहे, अशी भावना यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी व्यक्त केली.