बाणेर येथील ननावरे अंडर पास सर्व्हिस रोडवर ड्रिंक अँड ड्राइव्ह करत गुरुवारी एका १९ वर्षीय तरुणाने स्कूल बससह चार गाड्यांना धडक दिली. यावेळी संतप्त जमावाने पळून जाणाऱ्या वाहनावर दगडफेक केली. सुदैवाने अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र गाड्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. यावेळी नागरिकांनी वाहनचालकाला बाणेर पोलिसांच्या ताब्यात दिले.