राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांची ईडीने जप्त केलेली मालमत्ता मुक्त करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. दिल्ली ट्रिब्यूनल कोर्टाने हा मोठा निर्णय दिला आहे. त्यानंतर आता शिवसेनेच्या (ठाकरे) उपनेत्या सुषमा अंधारे यांनी यावरून अजित पवारांना खोचक टोला लगावला आहे. अंधारे यांनी काल (६ डिसेंबर) एक्सवर एक व्हिडीओ शेअर करुन अजित पवारांवर टीका केली.