PM Modi Death Threat & Mumbai Bomb Blast: मुंबई पोलिसांच्या वाहतूक नियंत्रण कक्षाला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हत्येचा कट रचला जात असल्याचा संदेश प्राप्त झाला आहे. संदेश पाठणाऱ्याने काही व्यक्ती मुंबई व धनबाद येथे बॉम्बस्फोट घडवून आणण्याच्या तयारीत असल्याचेही संदेशात म्हटले आहे. तसेच, पाकिस्तानी गुप्तचर यंत्रणा आयएसआयसाठी हे संशयित काम करत असल्याचे संदेशात म्हटले आहे. या संदेशाची मुंबई पोलिसांनी गंभीर दखल घेतली असून तातडीने संदेश पाठवणाऱ्या व्यक्तीचा शोध सुरू केला आहे.