Jitendra Awhad: माळशिरस तालुक्यातील मारकडवाडी गावात मतपत्रिकेद्वारे चाचणी मतदान घेण्याच्या निर्णयाबद्दल माळशिरसचे राष्ट्रवादी (शरद पवार) पक्षाचे आमदार उत्तम जानकर यांच्यावर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. त्यांच्यासह इतरही १०० हून अधिक ग्रामस्थांविरोधात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. दुसऱ्या बाजूला, विरोधी पक्ष ईव्हीएमविरोधातील आंदोलन आणखी तीव्र करण्याची तयारी करत आहेत.आज जितेंद्र आव्हाड हे विधानभवनाच्या बाहेर ‘लोकशाही जिंदाबाद, आय लव्ह मारकडवाडी’ , असं लिहिलेलं पोस्टर घेऊन उभे होते. यावेळी जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांनी काही प्रश्न उपस्थित केले.