Kalyan MSEB Employees and Citizens Dispute: चाळीत मीटर तपासणीसाठी गेलेल्या महावितरणच्या कर्मचाऱ्यांनी महिलेशी वाद घातला व मारहाण केल्या घटना कल्याण कचोरे परिसरात घडली आहे महावितरणच्या काँट्रॅक्ट वरील कर्मचाऱ्याने मारहाण केल्याचा रहिवाशांचा आरोप आहे. महावितरणाच्या कर्मचाऱ्यांसोबत दोन व्यक्ती होत्या त्यांच्याकडे ओळखपत्र नव्हते, प्रश्न विचारले असता त्यांनी मारहाण केली असल्याची माहिती रहिवाशींनी दिलीये. तर यावर उत्तर देताना वीज चोऱ्या पकडण्यासाठी आलो होतो, आम्ही तपासणी करतो असं सांगितले तर बाचाबाची झाले असल्याचे महावितरण चीफ टेक्निशीयन जयवंत हमरेंनी सांगितले