Devendra Fadnavis On Mahayuti Cabinet Home Ministry : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत महायुतीला निर्विवाद बहुमत मिळालं असून गुरुवारी (५ डिसेंबर) देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्राचे २१ वे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. तर, एकनाथ शिंदे व अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. राज्यात सरकार स्थापन झालं असलं तरी अद्याप मंत्रिमंडळ विस्तार बाकी आहे. त्यामुळे मंत्रिमंडळ विस्तार कधी होणार याकडे अनेकाचं लक्ष लागलं आहे. सध्या सर्व खाती ही एकट्या देवेंद्र फडणवीस यांच्याकडेच आहेत. दुसरीकडे, भाजपा आणि एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेमध्ये गृहमंत्री पदासाठी रस्सीखेच चालू असल्याचं पाहायला मिळत आहे. या पदामुळेच शिंदेंचं नाराजीनाट्य देखील पाहायला मिळालं. तसेच त्यांनी सरकारमध्ये सहभागी न होण्याची भूमिका घेतली होती. मात्र, भाजपा पक्षश्रेष्ठीं व शिवसेना (शिंदे) आमदारांच्या दबावामुळे शिंदेंनी उपमुख्यमंत्रीपद स्वीकारलं. आता स्वतः फडणवीसांनी भाजपाची गृहमंत्रीपदाबाबतची भूमिका स्पष्ट केली आहे.