Mumbai Pune Expressway Accident: मुंबई पुणे एक्सप्रेसवे लगतच्या फूड कोर्टमध्ये अनियंत्रित झालेला ट्रेलर धडकला असून त्याखाली तेथे काम करणारा एक कामगार मृत्युमुखी पडला आहे. या ट्रेलर ने अन्य तीन कारना धडक दिली आहे. सुदैवाने फूड कोर्ट मधील इतर कामगार आणि प्रवासी त्याचप्रमाणे बाधित कार मधील कोणीही व्यक्ती जखमी झालेली नाही. आय आर बी पेट्रोलिंग, देवदूत यंत्रणा, डेल्टा फोर्स, महाराष्ट्र सुरक्षा बल, लोकमान्य हॉस्पिटलची ॲम्बुलन्स आणि बोरघाट वाहतूक पोलीस स्टेशनचे सर्व कर्मचारी आणि अधिकारी घटनास्थळी मदत कार्य करत आहेत. अपघातग्रस्तांच्या मदतीसाठी सामाजिक संस्थेचे टीम मेंबर देखील मदत कार्य करत आहेत. बाधित वाहने बाजूला काढण्याचे काम सुरू असून. वाहतूकीला कोणताच अडथळा नाही.