Aamshya Padavi Taking Oath : विधानसभेच्या निवडणुकीत महायुतीला बहुमत मिळाल्यानंतर राज्यात महायुतीचं सरकार स्थापन झालं आहे. देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रिपदाची आणि एकनाथ शिंदे व अजित पवारांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. त्यानंतर ७ तारखेपासून राज्यात विशेष अधिवेशन बोलावण्यात आलेलं आहे. या विशेष अधिवेशनात आमदारांच्या शपथविधीचा कार्यक्रम पार पडत आहे.आज शिवेसनेचे (शिंदे) आमदार आमश्या पाडवी यांनी आमदारीकीची शपथ घेतली. मात्र, आमदारीकीची शपथ घेतल्यानंतर आमश्या पाडवी हे चांगलेच चर्चेत आले आहेत. कारण आमदारीकीची शपथ घेताना त्यांना शपथविधीतील एकही शब्द व्यवस्थित वाचता आला नाही