Aditi Tatkare On Ladki Bahin Yojna 2024: लाडकी बहिण योजना आम्ही अतिशय बारकारईने राबवलेली आहे 2 कोटी 40 लक्ष पेक्षा अधिक महिलांपर्यंत ही योजना पोहचवलेली आहे आणि योजना सुरु झाल्या पासून ज्यांच अडीच, एकलाखा पेक्षा कमी उत्पन्न असेलल्या महिलांचा फॅार्म भरुन घेतले आहे. काही तक्रारी आल्या तर मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्र्याच्या बैठकीत सोडवल्या जातील, अशी माहिती पूर्व सरकारमधील महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी आज विधिमंडळातील विशेष अधिवेशनाच्या तिसऱ्या दिवशी माध्यमांशी बोलताना दिली आहे.