Jayant Patil: राज्यात विधानसभेचे विषेश अधिवेशन चालू असून राहुल नार्वेकर (Rahul Narwekar ) यांची अध्यक्षपदी निवड झाल्याने अभिनंदनाचा प्रस्ताव मांडण्यात आला. यावेळी विविध पक्षातील नेत्यांनी राहुल नार्वेकर यांच्या कार्यशैलीचं कौतुक केलं. तसंच, राष्ट्रवादीचे (शरद पवार) आमदार जयंत पाटील यांनीही त्यांचं हटके अंदाजात कौतुक केलं. राहुल नार्वेकरांनी मागच्या अडीच वर्षांत कशाप्रकारे सहकार्य केलं, याचा पाढाच त्यांनी वाचला.