Rahul Gandhi: काँग्रेस खासदार व लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी संसदेच्या आवारात केलेल्या एका अनोख्या आंदोलनाची बरीच चर्चा होत आहे. राहुल गांधी यांनी संसदेच्या आवारात पंतप्रधान नरेंद्र मोदी व उद्योगपती गौतम अदाणी यांच्याविरोधात आंदोलन केलं, त्यांचे पोस्टर हातात घेऊन निषेध नोंदवला. दोघांमधील कथित हितसंबंधांमुळे देशाचं नुकसान होत असल्याचा दावा केला. त्यानंतर राहुल गांधी दोन खासदारांबरोबर प्रसारमाध्यमांसमोर आले, ज्यांनी चेहऱ्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी व उद्योगपती गौतम अदाणींचे मुखवटे लावले होते. या खासदारांना बरोबर घेत राहुल गांधी यांनी मोदी व अदाणींमधील कथित हितसंबंधांविरोधात अनोखं आंदोलन केलं. तसेच राहुल यांनी या दोघांची मुलाखतही घेतली.