Pune MLA Uncle Kidnapped CCTV: विधान परिषदेचे आमदार योगेश टिळेकर यांचे मामा सतीश सातबा वाघ यांचे अपहरण करण्यात आल्याची धक्कादायक घटना हडपसर भागातील फुरसुंगी फाटा येथे सोमवारी सकाळी घडली. अपहरण करणाऱ्या आरोपींच्या मागावर पोलिसांची पथके आहेत. सतीश सातबा वाघ (वय ५८, रा. फुरसुंगी, सासवड-पुणे रस्ता, हडपसर) हे सोमवारी सकाळी साडेसहाच्या सुमारास घरातून फिरायला बाहेर पडले. त्यावेळी मोटारीतून आलेल्या चार ते पाच जणांनी वाघ यांना धमकाविले. वाघ यांना धमकावून मोटारीत बसवून अपहरणकर्ते सासवड रस्त्याने पसार झाले. त्यावेळी तेथून निघालेल्या एकाने ही घटना पाहिली. त्यानंतर पोलिसांकडे तक्रार देण्यात आली.