Mumbai Best Bus Accident Video : मुंबईतील कुर्ला परिसरात भीषण अपघाताची घटना घडली असल्याची माहिती समोर आली आहे. एका भरधाव बेस्टच्या बसने अनेकांना धडक दिली आहे. या अपघातामध्ये ४९ जण जखमी झाले असून ६ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. या अपघातात जखमी झालेल्यांना तात्काळ उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.