हडपसर येथील भाजपचे नेते विधान परिषदेचे आमदार योगेश टिळेकर (Yogesh Tilekar) यांचे मामा सतीश वाघ यांच फुरसुंगी फाटा येथून काल सकाळी पहाटेच्या सुमारास अपहरण केल्याची घटना घडली होती. या प्रकरणाचा तपास सुरू असताना, यवत पोलिस स्टेशनच्या हद्दीत सतीश वाघ यांचा मृतदेह आढळून आला.या घटनेनंतर एकच खळबळ उडाली. या घटनेवर आमदार योगेश टिळेकर यांनी प्रतिक्रिया दिली आहे.