Beed Sarpanch’s Husband Kidnapped And Killed: बीडच्या केज तालुक्यात सरपंच पतीचे अपहरण करून खून झाल्याची घटना समोर आली. या घटनेने जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. केज तालुक्यातील मस्साजोग येथील संतोष देशमुख यांचे अपहरण करण्यात आले काही तासानंतर त्यांचा मृतदेह परिसरात आढळून आला.संतोष देशमुख हे मसाजोगच्या महिला सरपंच अश्विनी देशमुख यांचे पती आहेत. सोमवारी दुपारी अज्ञात व्यक्तींनी त्यांचे अपहरण केले. त्यानंतर त्यांचा मृतदेह आढळून आला. देशमुख यांच्या शरीरावर मारहाणीच्या जखमा आहेत. त्यामुळे त्यांचा खून झाल्याचा संशय व्यक्त होतोय. या प्रकरणी केज पोलीस ठाण्यात सहा जणांविरोधात गुन्हा दाखल झालाय.