दुर्गाडी किल्ल्याचा दावा नेमका कोणाचा याबाबत कल्याण न्यायालयात सुनावणी सुरु होती. अखेर याबाबत निकाल लागला असून याठिकाणी मंदिरच असल्याचा निर्वाळा न्यायालयाने दिला आहे. हा निकाल लागताच शिवसेना शिंदे गटातील कार्यकर्त्यांनी व हिंदू संघटनेच्या कार्यकर्त्यांनी आरती करत उत्साह साजरा केला आहे