Kurla Bus Accident News Update: रात्री ९ वाजून ३६ मिनिटांची वेळ, कुर्ल्यातील सदैव गर्दीच्या वाटेवरून ३३२ क्रमांकाची बस निघाली, नेहमीचीच गर्दी, नेहमीचीच घाई, काही कामाला निघालेले लोक, काही कामावरून परतणारे आणि तेवढ्यात काळाचा घाला पडला. आणि एकाएकी सात जणांचा मृत्यू झाला, ४९ हुन अधिक जण गंभीर जखमी झाले. बाईक, कारचा चुराडा झाला. अवघ्या ३ ते ५ मिनिटांत घडलेल्या या घटनेने अनेक कुटुंब उद्ध्वस्त झाली, फक्त मृतांचीच नव्हे तर ज्या बसचालकाच्या (संजय मोरे) हातून हा अपघात घडला त्यांनी सुद्धा समोर येऊन आपल्या ‘माणसाची’ बाजू मांडायचा प्रयत्न केलाय. कुर्ल्यातील या दुर्घटनेचे आतापर्यंतचे सर्व अपडेट्स व दोन्ही बाजू आपण या व्हिडीओमधून जाणून घेणार आहोत.