Is Deputy Chief Minister Position Valid By Law: एकनाथ शिंदे व अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. घटनेत उपमुख्यमंत्रीपद हे अस्तित्वात नसताना या पदासाठी घेतलेली शपथ घटनात्मक आहे का, असा प्रश्न उपस्थित होतो. पद संविधानिक नसताना त्या पदासाठी शपथ घेणे वैध आहे का, याविषयी सर्वोच्च न्यायालय व उच्च न्यायालयांमध्ये याला आव्हान देण्यात आले होते.