लाडकी बहीण योजना (Ladki Bahin Yojana) ही महायुतीसाठी गेमचेंजर योजना ठरली. महायुतीचा जो महानिकाल लागला आणि २३७ आमदारांचं बळ महायुतीला मिळालं त्यात लाडक्या बहिणींचा आणि लाडकी बहीण योजनेचा सिंहाचा वाटा आहे. दरम्यान भाजपाचे आमदार नितेश राणे यांनी आदिवासी समाज वगळता दोन पेक्षा जास्त मुलं असणाऱ्यांना लाडकी बहीण योजनेतून वगळा असं म्हटलं आहे.