कर्नाटकमधील काँग्रेस सरकारने कर्नाटकच्या विधानसभेतील स्वातंत्र्यवीर सावरकर यांची प्रतिमा हटवण्याचा निर्णय घेतल्याचा आरोप भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांकडून करण्यात येत आहे. त्यामुळे यावरून नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे. यावर आता भारतीय जनता पक्षाचे महाराष्ट्राचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी या संदर्भात भाष्य करत हल्लाबोल केला आहे. तसेच कर्नाटकमधील काँग्रेस सरकारने स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याबाबत घेतलेल्या भूमिकेवरून चंद्रशेखर बावनकुळे यांनी उद्धव ठाकरे यांना आव्हान देत इंडिया आघाडीमधून बाहेर पडण्याचा खोचक सल्ला दिला आहे.