पती आणि पत्नीमधील भांडण किंवा कौटुंबिक संघर्ष कधी-कधी इतका टोकाला जातो की एखादा व्यक्ती थेट टोकाचं पाऊल उचलतो. आता अशीच एक घटना बंगळुरुमध्ये एका खासगी कंपनीत काम करणाऱ्या एका व्यक्तीबरोबर घडली आहे. उत्तर प्रदेशातील रहिवासी असलेल्या अतुल सुभाषने बंगळुरूमधील एका फ्लॅटमध्ये गळफास लावून जीवन संपवलं आहे. यासाठी त्याने पत्नी, सासरची मंडळी आणि न्याय व्यवस्थेच्या कारभाराला जबाबदार धरलं आहे.