मारकडवाडीमध्ये भाजपा आमदार गोपिचंद पडळकर आणि राम सातपुते यांची सभा पार पडली. यावेळी शरद पवारांवर केलेल्या जहरी टीकेवरून ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे बोट दाखवलं आहे. फडणवीसांच्या पाठिंब्याने हे सुरू आहे का? असा प्रश्नही त्यांनी केला.