राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांचा आज ८५ वा वाढदिवस. यानिमित्ताने उपमुख्यममंत्री अजित पवार यांनी पत्नी सुनेत्रा पवार आणि पार्थ पवार यांच्यासह शरद पवार यांची दिल्लीतील निवासस्थानी भेट घेतली. यावेळी अजित पवार गटातील नेते छगन भुजबळ आणि खासदार प्रफुल्ल पटेल देखील उपस्थित होते.