लाडकी बहीण योजनेतील लाभार्थ्यांच्या अर्जाची पडताळणी करून लाखो लाभार्थी महिलांचे अर्ज बाद होतील. तसंच
योजनेचे निकष बदलले जातील, असे दावे सोशल मीडियाच्या माध्यमातून केले जात आहेत. याबाबत राज्याच्या महिला व बाल कल्याण विभागाला सातत्याने विचारणा होत आहे. तसंच माजी महिला व बालकल्याण मंत्री आदिती तटकरे यांना या प्रश्नांना सामोरं जावं लागत आहे. अखेर राज्याच्या महिला व बालकल्याण विभागाने या योजनेबाबत पसरत असलेल्या अफवांबाबत आता स्वतः स्पष्टीकरण दिलं आहे.