Ajit Pawar Wife MP Sunetra Pawar Gets Second Class Bunglow: राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाच्या खासदार सुनेत्रा पवार यांना दिल्लीतील प्रसिद्ध असलेल्या जनपथ मार्गावरील ११ क्रमाकांचा बंगला देण्यात आला आहे. याच मार्गावर सोनिया गांधी आणि शरद पवार यांचीही निवासस्थाने आहेत. सुनेत्रा पवार यांची खासदारकीची पहिलीच टर्म असतानाही त्यांना दुसऱ्या क्रमाकांचा दर्जा असलेला टाइप ७ प्रकाराचा बंगला देण्यात आला असून हा बंगला शरद पवार यांच्या ६ जनपथ या बंगल्याच्या समोर आहे. शरद पवार हे टाइप ८ दर्जाच्या बंगल्यात सध्या राहत असून त्यांची मुलगी खासदार सुप्रिया सुळेही याच बंगल्यात राहतात. सुनेत्रा पवारांना मिळालेल्या या बगळ्यावरून होणारी चर्चा व टीका याविषयी सविस्तर जाणून घेऊया.