Kurla BEST Bus Accident Fatima Ansari: माझी आई रक्ताच्या थारोळ्यात पडलेय आणि तो बांगड्या काढतोय, त्याला लाज तरी वाटते का? असा सवाल केलाय कुर्ला बस अपघातात आपली जन्मदाती गमावलेल्या लेकीने. कुर्ला बस अपघातात माणुसकी म्हणून जखमींना तात्काळ रुग्णालयात नेण्याची धावपळ एकीकडे असताना, व्हायरल झालेल्या एका व्हिडिओत मृत महिलेच्या हातातील सोन्याच्या बांगड्या काढून घेतल्याचा लाजिरवाणा प्रकारही समोर आला. या घटनेनंतर मयत फातिमा अन्सारी यांची कन्या मेहरुनिसा यांची भावनिक प्रतिक्रिया समोर आली आहे.