Sanjay Raut on Cabinet Expansion: महायुतीचे सरकार स्थापन होऊनही अद्याप मंत्रिमंडळ विस्तार आणि खातेवाटप झालेले नाही. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांनी शपथ घेतली. मात्र त्यांना अद्याप खातेवाटप झालेले नाही. एकनाथ शिंदे यांना गृह आणि अजित पवार यांना अर्थ खाते देण्यास भाजपाने विरोध दर्शविला आहे. तर एकनाथ शिंदे यांच्या पक्षातील काही नेत्यांना मंत्रिपद नको, अशीही भूमिका घेतलेली आहे. त्यामुळेच मंत्रिमंडळाचा विस्तार करण्यात अडचणी येत असल्याची टीका आता विरोधक करत आहेत. शिवसेना (ठाकरे) पक्षाचे नेते संजय राऊत यांनी यापुढे जाऊन टीका केली. ते म्हणाले, मंत्रिमंडळाची घोषणा झाल्यानंतर काही नेत्यांना हृदयविकाराचा झटका येण्याची शक्यता आहे. त्यामुळे रुग्णवाहिका तयार ठेवली पाहीजे.