Pushpa 2 Allu Arjun Arrested: तेलुगु चित्रपटसृष्टीतील सुप्रसिद्ध अभिनेता अल्लू अर्जुन याला पोलिसांनी अटक केली आहे. हैदराबादमध्ये ४ डिसेंबर रोजी ‘पुष्पा’ चित्रपटाच्या प्रीमियरवेळी घडलेल्या चेंगराचेंगरीच्या दुर्घटनेप्रकरणी पोलिसांनी ही कारवाई केली आहे. या घडामोडींमुळे चित्रपटसृष्टीला धक्का बसला असून आता अल्लू अर्जुनवर काय कारवाई होणार? याची चर्चा सुरू झाली. ४ डिसेंबरला घडलेल्या या चेंगराचेंगरीच्या दुर्घटनेमध्ये एका ३९ वर्षीय महिलेचा दुर्दैवी मृत्यू झाला होता. या महिलेचा मुलगा रुग्णालयात असून त्याची प्रकृती गंभीर आहे.