अभिनेता अल्लू अर्जुनला शुक्रवारी (१३ डिसेंबर २०२४) पोलिसांनी त्याच्या घरातून अटक केली होती. त्याला नामपल्ली कोर्टात हजर करण्यात आलं होतं. कोर्टाने त्याला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली होती.त्यानंतर अभिनेत्याने तेलंगणा हायकोर्टात धाव घेतली होती. दोन्ही बाजूंचे युक्तीवाद ऐकल्यानंतर त्याला कोर्टाने चार आठवड्याचा अंतरिम जामीन मंजूर केला. मात्र अल्लू अर्जुनला एक रात्र चंचलगुडा मध्यवर्ती कारागृहात घालवावी लागली. आज सकाळी त्याची सुटका करण्यात आली.