अभिनेता अल्लू अर्जुनला शुक्रवारी (१३ डिसेंबर २०२४) पोलिसांनी अटक केली होती. त्यानंतर त्याला कोर्टाने चार आठवड्याचा अंतरिम जामीन मंजूर केला. आता तुरुंगातून बाहेर आल्यानंतर अल्लू अर्जुननं पत्रकार परिषदेचे आयोजन केले. या पत्रकार परिषदेत त्यानं चाहत्यांचे आभार मानले आहेत.