विधानसभेच्या निकालानंतर राज्यात महायुतीचं सरकार स्थापन झालं असलं तरी अद्याप मंत्रिमंडळाचा विस्तार झालेला नाही.आता १५ डिसेंबर रोजी मंत्रिमंडळाचा विस्तार होणार असल्याची चर्चा आहे.अशातच चित्रा वाघ यांना मंत्रिमंडळ विस्ताराबाबत प्रश्न विचारण्यात आला. तसेच संजय राठोड यांना मंत्रिपद मिळणार का?असा प्रश्न देखील चित्रा वाघ यांना विचारण्यात आला. या प्रश्नाचं त्यांनी उत्तर दिलं आहे.