Maharashtra Cabinet Expansion: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील सरकारचा शपथविधी काही तासांवर आला आहे. मात्र तरीही तीनही पक्षांकडून अद्याप संभाव्य मंत्र्यांची नावे जाहीर केलेली नाहीत. मात्र पक्षाच्या प्रमुख नेत्यांकडून काही आमदारांना शपथविधीसाठी फोन गेले आहेत. किती मंत्र्यांचा शपथविधी होणार, महायुतीतील तीन घटक पक्षांच्या वाट्याला किती मंत्रीपदे मिळणार हे सारेच अद्याप गुलदस्त्यात आहे. महायुतीतील तिन्ही पक्षांमधील इच्छुक शनिवारी शपथविधीच्या निरोपाची दिवसभर वाट बघत होते. आता शिवसेना (शिंदे) पक्षाचे नेते भरत गोगावले यांनी संभाव्य मंत्र्यांची नावे सांगितली आहेत.