महायुतीच्या मंत्रिमंडळाचा शपथविधी काल पार पडला. मात्र या मंत्रिमंडळात राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांचा समावेश नाही, त्यामुळे ते नाराज असल्याची चर्चा आहे. याविषयी आमदार अमोल मिटकरी यांना प्रश्न विचारला असता त्यांनी प्रतिक्रिया दिली आहे. यावेळी त्यांनी शिंदे गटातील दीपक केसरकर आणि भाजपाचे नेते सुधीर मुनगंटीवार यांनाही मंत्रिपद न मिळाल्याबाबत भाष्य केलं आहे.