Maharashtra Assembly Winter Session Nagpur: देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार रविवारी नागपूरच्या राजभवनात पार पडला. महाराष्ट्र विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन सोमवारपासून सुरू होत असताना एक दिवस आधी हा शपथविधी सोहळा घेण्यात आला. यावेळी राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांनी नवीन ३९ मंत्र्यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली. त्यानंतर महायुतीकडून घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत बोलत असताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंत्रिमंडळ विस्तारासह बीड आणि परभणी घटनेवर भाष्य केले.