Uddhav Thackeray Vs Rane Family : राज्यात विधानसभा निवडणुकीनंतर आधी मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री आणि काल मंत्रिमंडळाचा शपथविधी पार पडला. यामध्ये महायुतीतील ३९ आमदारांनी कॅबिनेट आणि राज्यमंत्रिपदाची शपथ घेतली. यात भाजपाच्या वाट्याला २० मंत्रिपदे आली आहेत. या २० जणांमध्ये कणकवलीचे आमदार नितेश राणे यांचाही समावेश आहे. दरम्यान काल नितेश राणे यांनी मंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर कुडाळ-मालवण मालवण मतदारसंघाचे शिवसेनेचे (एकनाथ शिंदे) आमदार आणि त्यांचे भाऊ निलेश राणे यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना, “राणेंना संपवता संपवता तुमचं काय झालं बघा”, असे म्हणत टोला लगावला आहे.