कुर्ला येथे घडलेल्या भीषण अपघाताचा मुद्दा आज विधीमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात देखील चर्चेत होता. शिंदे गटाचे आमदार सुनील शिंदे यांनी हा मुद्दा उपस्थित करत एकाच आठवड्यात चार बेस्ट अपघात घडल्याची माहिती दिली. तसंच मुंबईकरांचा जीव धोक्यात आहे असं म्हणत त्यांनी जुन्या झालेल्या बेस्ट गाड्यांचा विषय निदर्शनास आणून दिला. त्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उत्तर दिलं आहे.