परभणीतील सोमनाथ सुर्यवंशीचा झालेला मृत्यू आणि बीडमधील संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणावरून राजकीय वातावरण तापलं आहे. हे प्रकरण विरोधकांनी लावून धरत त्याविषयी संताप व्यक्त केला आहे. आज विधीमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी माध्यमांना संबोधित करत हत्याप्रकरणातील वाल्मीक कराड यांच्या अटकेची मागणी केली आहे.