Prakash Ambedkar On Somnath Suryavanshi Death: परभणी येथील स्टेशन रोडवरील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्यासमोर असलेल्या संविधान प्रतिकृतीचा अवमान झाल्याचा प्रकार समोर आला होता. याच्या निषेधार्थ पुकारण्यात आलेल्या बंदला हिंसक वळण लागले. शहरातील काही दुकाने आणि वाहनांवर दगडफेकीच्या घटना घडल्या. संतप्त जमावाने एसटी बसवरही दगडफेक केली होती. दरम्यान आता या दगडफेक प्रकरणी न्यायालयीन कोठडीत असलेल्या एका तरुणाचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी सोशल मिडिया प्लॅटफॉर्म एक्सवर मृत सोमनाथ सूर्यवंशी यांच्या पोस्टमोर्टम अहवालात समोर आलेली माहिती सांगितली आहे.