Laxman Hake: राज्यातील महायुती सरकारचा काल नागपूर येथे मंत्रिमंडळ विस्ताराचा सोहळा पार पडला.या मंत्रिमंडळ विस्तारामध्ये अनेक नव्या चेहर्याना संधी देण्यात आली. मात्र अजित पवार गटाचे ज्येष्ठ नेते आणि आमदार छगन भुजबळ आणि भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांना मंत्रिमंडळात स्थान देण्यात आले नाही.यामुळे राज्यातील ओबीसी समाज नाराज झाल्याचे पाहण्यास मिळत आहे.